वर्गात अश्लिल चाळे करणाऱ्या शिक्षकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। ढोकी

जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक कन्या प्रशालेत भरवर्गात विद्यार्थ्यांसमोर अश्लिल चाळे करणाऱ्या एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. व्यंकट श्रीरंग चौरे (४०) असे या शिक्षकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात ढोकी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौरे येथील पाचवी ते सातवीपर्यंतच्या वर्गांना शिकवत होता. पण  शिकवताना तो अश्लिल चाळे करत असल्याचं विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ही बाब शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या कानावर घातली. नंतर मुख्याध्यापिकांच्या फिर्यादीवरुन सोमवारी ढोकी पोलीस ठाण्यात व्यंकट श्रीरंग चौरे याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर त्याला तात्काळ अटक करण्यात आली.