विराटने चौथ्या क्रमांकावर खेळायला हवे होते! संघ व्यवस्थापनातच दिसले मतभेद

30

सामना प्रतिनिधी । मुंबई

यंदाच्या विश्वचषकाच्या उपांत्य लढतीप्रसंगी कर्णधार विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी होती असा मतप्रवाह टीम इंडियाच्या व्यवस्थापनात होता, पण त्याबाबत निर्णय न झाल्याने अखेर विराट तिसऱया स्थानी खेळायला आला आणि त्याची मोठी किंमत टीम इंडियाला मोजावी लागल्याचे उघड झाले आहे. कोहलीबाबतची ती चर्चा व्यवस्थापनाने गंभीरपणे घेतली असती तर कोटय़वधी हिंदुस्थानी चाहत्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला नसता असे आता बोलले जात आहे. मँचेस्टरच्या लढतीवर टीम इंडियाची पकड असताना पावसाचे आगमन आणि राखीव दिवशी खेळपट्टीचा अंदाज न घेता घिसाडघाईने फलंदाजीचा पूर्वीचाच प्लॅन राबवणे विराट सेनेच्या चांगलेच अंगाशी आले असे मत क्रिकेटचे जाणकार व्यक्त करीत आहेत.

…तर पैसे देऊन बॅटिंग पाहायला येईन – लॉईड

विश्वचषक उपांत्य लढतीतील एका अपयशाने विराट कोहलीला कमी लेखू नका. कारण त्याच्यासारखा जिगरबाज फलंदाज कधीही संघासाठी यश खेचून आणू शकतो. विराटची फलंदाजी पाहण्यासाठी मी पैसे खर्च करूनही जाईन, अशा शब्दांत वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार क्लाइव्ह लॉईड याने विराटच्या खेळाची प्रशंसा केली.

आपली प्रतिक्रिया द्या