
शारदाश्रम विद्यामंदिर ही संस्था गेली 75 वर्षे मुंबईतील दादर येथे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे महान कार्य करत आहे. संस्थेच्या वतीने उद्या, सोमवारी तांत्रिक विद्यालयात सकाळी 11 ते 3 या वेळेत बाबुराव परुळेकर हॉलमध्ये तंत्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे कार्यवाह गजेंद्र शेट्टी आणि प्रशासकीय प्रबंधक वनजा मोहन यांच्या हस्ते होणार आहे. तसेच तांत्रिक शिक्षण ही काळाची गरज असून त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी संस्थेतर्फे रविवारी तंत्र दिंडी काढण्यात आली. या दिंडीचा शुभारंभ शारदाश्रम विद्यामंदिर संस्थेचे खजिनदार प्रताप आजगावकर यांच्या उपस्थितीत झाला.



























































