मोबाईल स्लो झालाय? मग ‘या’ ट्रिक्स वापरून वाढवा स्पीड..

स्मार्टफोनचा वापर आता केवळ मेसेज पाठवणे आणि कॉलपुरता मर्यादित राहिलेला नाही. आज बरीच अशी महत्त्वाची कामे आपण मोबाईलद्वारे सहजपणे करतो. अशातच आपला स्मार्टफोन स्लो चालत असल्यास अनेकजण अस्वस्थ होतात. आज यासंबंधित काही म्हत्वाची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याचा उपयोगकरून तुम्ही तुमच्या मोबाईलची स्पीड वाढू शकता.

मोबाइल फोन स्लो चालत असेल तर आपल्या मोबाईलमध्ये कोणते असे अॅप्स आहेत, जे आपल्यासाठी आवश्यक नाही. हे तपासून पाहा. तसेच मोबाईलमधून असे अ‍ॅप्स त्वरित अनइंस्टॉल करा. असे केल्याने फोनचे स्टोरेज वाढते.

क्लिअर cached डेटा

तुम्हाला माहित आहे का, वारंवार वापरल्या जाणार्‍या मोबाईल अ‍ॅप्सने cache एकत्रित होऊ लागतात. मोबाईल स्लो होण्याचे हेही एक कारण आहे. यामुळे नियमितपणे आपण जे अ‍ॅप वापरत असाल त्याचे cache क्लिअर करा.

असं करा cache क्लिअर

  • सर्वात आधी फोनच्या सेटिंग्जवर जा.
  • त्यानंतर अ‍ॅप्स पर्यायावर क्लिक करा.
  • येथे आपल्याला सर्व अ‍ॅप्सची लिस्ट मिळेल, जे आपल्या मोबाईलमध्ये आहेत.
  • यानंतर त्या अ‍ॅपवर क्लिक करा ज्याचे cache क्लिअर करायचे आहे.

बॅकग्राऊंड अ‍ॅप बंद करा

मल्टीटास्किंगच्या बॅकग्राऊंडमध्ये बरेच मोबाईल अ‍ॅप्स एकाच वेळी चालत असतात. मात्र यापैकी बरेच अॅप्स असेही असतात ज्यांचा फोनच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. ज्यामुळे फोन स्लो चालतो. त्यामुळे असे अ‍ॅप्स बॅकग्राऊंडमधून बंद करा.

आपली प्रतिक्रिया द्या