आई ओरडली म्हणून बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आईचा ओरडा खावा लागला म्हणून एका बारावीच्या विद्यार्थिनीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद इथे ही घटना घडली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, नेहा (नाव बदललेले) ही अल्पवयीन मुलगी बारावीची विद्यार्थिनी आहे. शनिवारी तिचा तिच्या आईशी वाद झाला होता. त्या वादात आईकडून तिला चांगलाच ओरडा पडला होता. या ओरड्याने व्यथित झालेल्या नेहाने एक टोकाचं पाऊल उचललं.

त्या वादामुळे चिडलेल्या नेहाने घरातच असलेला वडिलांचा देशी कट्टा उचलला आणि स्वतःवर गोळी झाडली. तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

या दरम्यान नेहाचे वडील प्रेमपाल घरात नव्हते. त्यांना ही माहिती नंतर देण्यात आली. पोलिसांनी नेहाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून तो अहवाल आल्यानंतरच पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.