
स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (एसएमए) या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या तीरा कामत या चिमुकलीच्या मदतीसाठी मुंबईसह देशभरातून अनेक मदतीचे हात पुढे आले. या मदतीनंतर आता तीराच्या मदतीसाठी राज्य सरकारदेखील पुढे सरसावले असून तीरासाठी लागणाऱ्या इंजेक्शनवरील कस्टम डय़ुटी रद्द करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा राज्य सरकारने केली आहे. परिणामी तीराला देण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा हिंदुस्थानात येण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून दोन आठवडय़ांत हे इंजेक्शन मुंबईत दाखल होणार आहे.
मुंबईच्या मिहीर आणि प्रियंका कामत यांची मुलगी तीराला पाच महिन्यांची असतानाच या आजाराने ग्रासले. तिच्या उपचारासाठी अमेरिकेतून इंजेक्शन आणायचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्याची पिंमत 16 कोटी आहे. तीराच्या आई-वडिलांनी क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून ते उभे केले. मात्र हे इंजेक्शन अमेरिकेहून येणार असल्याने त्यासाठी तब्बल 6 कोटी रुपयांचा आयातकर आणि कस्टम डय़ुटी द्यावी लागणार होता. इतक्या मोठय़ा प्रमाणात हा कर भरावा लागणार असल्याने नवा प्रश्न कामत कुटुंबीयांसमोर उभा ठोकला. त्याच वेळी अभिनेता नीलेश दिवेकर कामत कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढे आला.
पेंद्र सरकारचाही मदतीचा हात
राज्य सरकारने तीराला मदतीचा हात पुढे केल्यानंतर तातडीने पेंद्र सरकारनेदेखील याची गंभीर दखल घेतली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती करीत तिच्या इंजेक्शनवरील कर माफ करण्याची मागणी केली. या पत्राची गंभीर दखल पंतप्रधान कार्यालयानेदेखील घेतली. पंतप्रधान कार्यालयाने तीराच्या उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनवरील कोटींचा कर माफ केला आहे.
अभिनेता नीलेश दिवेकर आला धावून
अभिनेता नीलेश दिवेकर याने हे सर्व प्रकरण शिवसेना सचिव आणि राज्यसभा खासदार अनिल देसाई यांच्या कानावर घातले. देसाई यांनी या सर्व प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. त्याची गंभीर दखल घेत ताबडतोब ठाकरे सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली. तीराला मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित विभागाला सूचना केली. यानंतर तीराच्या इंजेक्शनला द्यावा लागणारा सीमा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेत राज्य सरकारने कामत कुटुंबीयांना मोठा दिलासा दिला.





























































