
बिहार निवडणुकीकडे साऱ्या देशाच्या नजरा लागल्या आहेत. बिहारमध्ये सत्ता टिकवण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. पण एनडीएत अजूनही नाराजीचे वातावरण आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. तसेच तेजस्वी यादव यांनी दोन जागांवरून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
या दोन मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ त्यांचा कौटुंबिक बालेकिल्ला राघोपुर आहे. दुसरा म्हणजे फुलपरस (मधुबनी) अशी चर्चा आहे. फुलपरस (मधुबनी) येथे सध्या जनता दल (युनायटेड) पक्षाच्या शीला कुमारी आमदार आहेत.