वाहनचालक मोबाईलवर बघत होता सिनेमा; कारचा झाला अपघात आणि…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एलॉन मस्क यांच्या टेस्ला कारची सर्वत्र बोलबाला आहे. या कारची क्रेझ अनेकांना आहे. आपलीही अशीच कार असवी असे अनेकांचे स्वप्न असते. ही कार ऑटोपायलट आणि सेल्फ ड्रायव्हिंग यासाठी नावाजली आहे. कारमध्ये ऑटोपायलट मोड असल्याने अनेकदा चालकासह प्रवाशांचा जीव वाचतो. मात्र, अशा कार काहीवेळा अपघातग्रस्त झाल्या आहेत. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे.

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये ही घटना घडली आहे. ऑटोपायलट मोडवर असलेली एक टेस्ला कार रस्तेच्या कडेला जात अपघातग्रस्त झाली आहे. नॉर्थ कॅरोलिनाच्या राज्य महामार्गावर दोन अधिकारी बातचीत करत होते. त्यावेळी रस्त्यातून जाणारी टेस्ला कार त्यांच्यामागे येते आणि रस्त्याच्या कडेला गेल्यावर अपघातग्रस्त होते. सतर्क असल्याने आणि मागून कार येत असल्याचे बघून अधिकाऱ्यांनी प्रंसगावधान राखले. त्यांनी कारला मार्ग देत ते बाजूला झाले. त्यामुळे या दुर्घटनेतून ते थोडक्यात बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ही टेस्ला कार मॉडेल एसची आहे. ही कार देविंदर गोली नावाचे डॉक्टर चालवत होते. त्यांनी कार ऑटोपायलट मोडवर ठेवली होती आणि ते मोबाईलवर सिनेमा बघत होते, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यावेळी प्रशासनानचे अधिकारी घटनास्थळी दुसऱ्या एका अपघाताबाबतचा तपास करत होते. मात्र, ते सतर्क असल्याने आणि मागून कार येत असल्याचे पाहून ते बाजूला झाले. त्यामुळे ते दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत.

ही टेस्ला कार पुढे जात रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला धडकून अपघातग्रस्त झाली आणि थांबली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कार ऑटोपायलट मोडवर ठेवत मोबाईलवर सिनोमा बघणाऱ्या डॉक्टर गोली यांना अटक केली आहे. अशा प्रकारे कार ऑटोपायलट मोडवर ठेवत चालवणे धोक्याचे आहे. ही अत्याधुविक फिचर वाहनचालकाचा आणि प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी आहे. स्वतःच्या मनोरंजनासाठी या फिचरचा वापर धोकादायक ठरून शकतो. त्यामुळे या फिचरचा वापर करताना सतर्क राहण्याची गरज अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.