
सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने सुरी हल्ला करून त्यांची दोन बोटे कापल्याच्या घटनेचे आज झालेल्या महासभेत जबरदस्त पडसाद उमटले. तब्बल दहा तास झालेल्या वादळी चर्चेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी बेकायदा फेरीवाले व अनधिकृत बांधकामांविरोधात प्रचंड आक्रमक पवित्रा घेत महासभा दणाणून सोडली.
फेरीवाल्यांनी ठाण्याची वाट लावली असून ते कोणत्याही पक्षाचे, जातीचे किंवा धर्माचे नाहीत. या फेरीवाल्यांच्या संघटित टोळय़ा बनल्या असून त्या कोणत्याही परिस्थितीत मोडून काढणारच, असा निर्धार महापौर नरेश म्हस्के यांनी केला. मुजोर फेरीवाल्यांवर कडक कारवाई करा, असे आदेशच त्यांनी प्रशासनाला दिले.
कासारवडवली येथे सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यांनी केलेल्या सशस्त्र्ा हल्ल्यात सुदैवाने त्यांचे प्राण बचावले. परंतु त्यांची दोन बोटे तुटून पडली. पिंपळे यांचा सुरक्षा रक्षक सोमनाथ पालवे यांच्यावरही फेरीवाल्याने केलेल्या चाकू हल्ल्यात त्यांचे एक बोट तुटले. आजच्या महासभेत फक्त आणि फक्त फेरीवाल्यांचा धुमाकूळ व बेकायदा बांधकामे हाच विषय अजेंडय़ावर होता.
हा महापालिकेवरचा हल्ला
हा हल्ला केवळ कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेला नाही तर तो महापालिकेवर झालेला आहे आणि या घटनेची आमच्या सर्वांच्याच मनात प्रचंड चीड आहे, असे सांगतानाच टपऱया, बेकायदा बांधकामे, हातगाडय़ा यांचा कोणताही मुलाहिजा न ठेवता त्या उद्ध्वस्त करा, असे महापौर म्हस्के यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले. ज्यावेळी पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने हल्ला केला तेव्हा कर्मचारी कुठे होते, याची कसून चौकशी करून कारवाई करा, असे आदेशही महापौरांनी दिले.
स्थायी समितीच्या 10 सदस्यांची निवड
स्थायी समितीमधील 10 सदस्यांचा कालावधी संपल्याने त्याजागेवर नव्या सदस्यांची नियुक्ती आज करण्यात आली. त्यात शिवसेनेचे सुधीर कोकाटे, उमेश पाटील, संतोष वडवले, मधुकर पावशे, मीनल संख्ये, अनिता गौरी, राष्ट्रवादीचे सुहास देसाई, भाजपचे मिलिंद पाटणकर, सुनेश जोशी व अर्चना मणेरा यांचा समावेश आहे.
अतिक्रमणविरोधी विभागातील कर्मचाऱयांना शस्त्र द्या!
यापुढे फेरीवाल्यांवर कारवाई करताना अतिक्रमणविरोधी विभागातील कर्मचाऱयांना शस्त्र्ाs द्या, अशी मागणी नगरसेवक नरेश मणेरा यांनी केली. शिवसेनेचे विकास रेपाळे, नंदिनी विचारे, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे यांनीही यावेळी कडक पावले उचलण्याची मागणी केली.
ठाण्यात भूमाफियांनी बेकायदा इमारती बांधण्याचा सपाटा लावला आहे. यापुढे बेकायदा इमारत कोसळली तर त्या प्रभागातील तत्कालीन सहायक आयुक्त व संबंधित अधिकाऱयांवरच कारवाई करा, असेही महापौरांनी बजावून सांगितले.































































