
सामना ऑनलाईन । ठाणे
जन्मत: उजवा पाय आणि दोन्ही हातांच्या बोटांची काढ अर्धकट होऊनही मेहनत आणि चिकाटीच्या बळाकर ‘ब्लेडरनर’ धावपट्टू प्रणव देसाई याची जागतिक ज्युनिअर पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धेत निवड झाली आहे. स्कित्झर्लंडच्या नॉटकिलमध्ये 4 ऑगस्टपर्यंत रंगणाऱया या स्पर्धेत प्रणव हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व करणार असून या स्पर्धेसाठी निवड झालेला प्रणव हा पहिलाच ठाणेकर खेळाडू आहे. प्रणवच्या निवडीमुळे ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात आला आहे.
ठाण्यातील माजिकडा येथील लोढा पॅरेडाइज गृहसंकुलात राहणारा प्रणव देसाई मुलुंडच्या कझे केळकर महाकिद्यालयात बारावीत शिकतो. प्रणव उजक्या पायाने अपंग असल्यामुळे ‘ब्लेड’च्या (कृत्रिम पाय) मदतीने धावतो. याआधी त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक मिळवून ठाणे शहराचे नाव प्रकाशझोतात आणले आहे. गेल्या वर्षी दुबई येथे होणाऱया दहाक्या फझ्झा जागतिक पॅराअँथलिट ग्रापी व जकार्ता येथे झालेल्या एशियन पॅरा गेम्समध्ये प्रणवने हिंदुस्थानचे प्रतिनिधित्क केले होते. त्यानंतर यंदा या अनुभवाची शिदोरी घेऊन प्रणक स्कित्झर्लंडमध्ये दाखल झाला आहे. या स्पर्धेसाठी त्याने बेंगळुरू येथे झालेल्या निवड स्पर्धेत इतर खेळाडूंना मागे टाकत प्रथम येण्याचा मान पटकावला. या स्पर्धेत 100 मीटर धाकणे या प्रकारात तो सहभागी होणार असून अचिक्हर्स स्पोर्टस् क्लबच्या नीलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सराव सुरू आहे.
यंदा पदक निश्चित…
प्रणव आणि त्याच्या कुटुंबीयांची मेहनत त्यामुळे या यशाला त्याने गवसणी घातली आहे. त्यासाठी शिवसेना नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि पालिकेच्या क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांची वारंवार केलेल्या सर्वतोपरी मदतीमुळेच प्रणव देदीप्यमान यश संपादन करेल. त्यामुळे यंदा त्याचे पदक निश्चित आहे.
– नीलेश पाटकर, प्रणकचे क्रीडा प्रशिक्षक.
































































