
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या आकडेवारीच्या आधारेच आरोप केले होते. असे असताना राहुल यांना धमक्या देऊन आयोगाने आपली अकार्यक्षमताच नव्हे, तर पक्षपातीपणा सिद्ध केला आहे, असा टोला काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी हाणला. निवडणूक आयोग बिहार एसआयआर प्रक्रियेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची तंतोतंत अंमलबजावणी करेल का? याची आम्हाला उत्सुकता आहे, असे रमेश म्हणाले. कुठल्याही प्रश्नांची उत्तरे नसताना धमक्या देणे म्हणजे मतचोरीबरोबर शिरजोरी करण्यासारखे आहे, असेही काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या.