गडकरी म्हणतात, एक्झिट पोलचा अंदाज म्हणजे अंतिम निकाल नाही, पण…

nitin-gadkari

सामना प्रतिनिधी । नागपूर

रविवारी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाल्यापासून विरोधकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, तर एनडीएच्या आत्मविश्वासाला बळ मिळाले आहे. असे असतानाही एक्झिट पोलचा अंदाज हा काही अंतिम निकाल नाही, परंतु भाजप सत्तेत येईल याचे ते संकेत आहेत, असा दावा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला. तसेच देशात पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असून नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील, असेही गडकरी म्हणाले.

Lok sabha election 2019 एक्झिट पोलनंतर संघ नेते गडकरींच्या भेटीला

सोमवारी अभिनेता विवेक ओबेरॉय याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘पीएम मोदी’ या चित्रपटाच्या पोस्टरचे नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गडकरी यांनी मोदींच्याच नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट केले.

gadkari

भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल आणि केंद्रात एनडीएचे सरकार येईल. महाराष्ट्रातही 2014 सारखेच निकाल लागतील, असेही त्यांनी म्हटले. तसेच आपण पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, मी 20 ते 25 वेळा याबाबत स्पष्ट केले आहे. आम्ही मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो. त्यामुळे स्वाभाविकपणे तेच पंतप्रधान होतील.

भाजप महायुतीला एक्झिट पोलपेक्षाही जास्त जागा मिळतील, सुरेश प्रभू यांचा दावा