आयफोनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आयफोनप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच आयफोन 16 सिरिजच्या लाँच इव्हेंटबाबत नवी घोषणा करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. आयफोन लाइन अप इव्हेंटची नवी अधिकृत घोषणा Apple कडून करण्यात आली आहे. पुढील महिन्यात 9 सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील अॅपल पार्क येथे भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता लाँच इव्हेंटचे प्रक्षेपण होणार आहे. या इव्हेंटमध्ये आयफोनच्या 16 सिरीजमधील iPhone 16, iPhone 16 Plus, iPhone 16 Pro, आणि iPhone 16 Pro Max या चार मॉडेल्सचे Apple अनावरण करण्याची अपेक्षा आहे.
आयफोन 16 मालिकेतील आणखी एक रोमांचक गोष्ट म्हणजे या सिरीजमध्ये नवीन फिजीकल कॅप्चर बटण असू शकते. हे बटण वापरकर्त्यांना त्वरीत फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास अनुमती देईल. तसेच लॉकिंग एक्सपोजर, फोकस समायोजित करणे आणि झूम इन किंवा आउट करणे यासारख्या वैशिष्ट्यांसाठी फोर्स सेन्सेटीव्ह हाफ प्रेस अॅक्शनला समर्थन देईल अशीही चर्चा आहे.
Apple Watch, AirPods Max आणि विशेष आवृत्ती
आयफोन 16 व्यतिरिक्त, अॅपल नवीन अॅपल वॉच मॉडेल्सचे अनावरण करेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये वॉच सिरीज 10, वॉच अल्ट्रा 3 आणि अधिक परवडणारे वॉच एसई यांचा समावेश आहे. Apple पुढील जनरेशनचे AirPods Max आणि दोन नवीन AirPods मॉडेल सादर करू शकते, अशी चर्चा आहे.
हा कार्यक्रम Apple साठी iOS 18, iPadOS 18, macOS Sequoia, watchOS 11 आणि त्याच्या इतर प्रमुख ऑपरेटिंग सिस्टमसाठी अधिकृत लाँच तारीख घोषित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून देखील काम करेल.