‘द कश्मीर फाइल्स’ची बॉक्स ऑफिसवर तुफान घोडदौड, 180 कोटींची कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाइल्स या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली घोडदौड कायम ठेवली आहे. गेल्या 11 दिवसांत या चित्रपटाने 180 कोटींचा गल्ला जमा केला असून लवकरच हा चित्रपट 200 कोटींच्या घरात जाईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

विशेष म्हणजे द कश्मीर फाइल्सच्या तुलनेने राधेश्याम, गंगुबाई काठियावाडी आणि बच्चन पांडे या बिग बजेट आणि तगडी स्टारकास्ट असलेले चित्रपट खूप पाठी पडले आहेत. या चित्रपटाचं बजेट अवघं 14 कोटी इतकं होतं. पण, माउथ पब्लिसिटीच्या जोरावर या चित्रपटाने मोठा पल्ला गाठला आहे.

प्रदर्शित झाल्यानंतरच्या दुसऱ्या सोमवारी 12 कोटींहून अधिकचा गल्ला जमवत या चित्रपटाने सूर्यवंशी, 83 द फिल्म आणि हॉलिवूडच्या स्पायडरमॅनलाही मागे टाकलं आहे. रविवारी देखील या चित्रपटाने 26.20 कोटी इतकी कमाई केली.

या चित्रपटात कश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांची कहाणी चित्रित करण्यात आली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती लाभताना दिसत आहे.