जितेंद्र कुमारचा ‘ड्राय-डे’

पंचायतवेब सीरिजमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता जितेंद्र कुमार तसेच अन्नू कपूर आणि श्रिया पिळगांवकर यांचा ‘ड्राय-डे’ चित्रपट 22 डिसेंबर रोजी प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.‘ड्राय-डे’ हिंदीसोबत तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित होईल.

‘ड्राय-डे’ या चित्रपटात जितेंद्र कुमार ‘गन्नू’ ही भूमिका साकारणार आहे, जो व्यवस्थेच्या विरोधात जातो. गन्नू केवळ त्याच्या प्रेमासाठी जगाशी लढत नाही, तर स्वतःची मद्यपानाची सवय सोडवण्यासाठी लढा देताना दिसणार आहे.

जितेंद्र कुमारने ‘पंचायत’ व्यतिरिक्त ’कोटा फॅक्टरी’, ‘टीव्हीएफ  पिचर्स’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तसेच 2020 मध्ये रिलीज झालेल्या हिंदी चित्रपट ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटामध्ये देखील  काम केलंय.