स्वयंपाकघरातला तुटलेला पाइप दुरुस्त करून देण्याचे प्लंबरने घेतले 4 लाख रुपये

स्वयंपाकघरातला तुटलेला पाइप दुरुस्त करण्यासाठी आलेल्या एका प्लंबरने हजाराचे नाही, तर चक्क चार लाखाचे बिल एका विद्यार्थ्याकडून घेतले. ते बिल पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसल्याची घटना लंडन येथे घडली आहे.

लंडन येथील हँट्स येथे राहणाऱ्या एश्ले डगलस या विद्यार्थ्याच्या स्वयंपाकघरात एक दिवस बरेच पाणी साचले. याचे कारण स्वयंपाकघरातला पाण्याचा पाइप तुटला होता. हा पाइप दुरुस्त करण्यासाठी त्याने एम पीएम सर्विसचे प्लंबर मेहदी पैरवी यांना घरी बोलावले. पाइप दुरुस्त करून झाल्यानंतर प्लंबर मेहदीने विद्यार्थी एश्लेच्या हातात दिलेले बिल पाहून तो थक्कच झाला, कारण ते बिल 3900 पाउंड्स म्हणजे चार लाख रुपयांचे होते.

या भल्या मोठ्या रकमेच्या बिलाविषयी जेव्हा एश्लेने प्लंबरला विचारले तेव्हा त्याने आधी त्याकडे दुर्लक्ष केले आणि नंतर सांगितले की, मी माझ्या कामाचे कितीही पैसे घेऊ शकतो. मग एक तासाकरिता 1 कोटीही घेऊ शकतो. याकरिता कोणाला काहीच फरक पडायला नको. कारण मी एक उत्कृष्ट प्लंबर आहे. त्यामुळे माझ्या कामाची किंमत मी ठरवू शकतो. या प्रकाराविषयी नील नावाच्या एका दुसऱ्या प्लंबरने सांगितले की, एश्लेकडून मेहदी जास्त पैसे घेतोय. कारण हे काम खूपच कमी पैशात करून देण्यासारखे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या