
पेण शहराच्या विकासकामात भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी टक्केवारी खातात. त्यांना जनता नगर परिषद निवडणुकीत पुन्हा निवडून देणार नाही. विकासकामात टक्केवारी खाणाऱ्यांना जनता नाकारेल, असा विश्वास काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला.
पेण नगर परिषद निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री 26 नोव्हेंबर रोजी पेण येथे येत आहेत. या पार्श्वभूमीवर नंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष राणी अगरवाल, पेण विधानसभा निरीक्षक मनोज कांबळे आदी उपस्थित होते.


























































