
अंबड तालुक्यातील चिकनगाव परिसरात सायंकाळी 4 वाजेपासून 7 वाजेपर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने चिकनगाव येथील ओढे व नाल्यांमध्ये पाणी शेतात शिरल्याने पिकांचे खूप मोठे नुकसान होत आहे.
अंबड तालुक्यासह बदनापूर तालुक्यात झालेल्या पावसाने सुकना नदी दुथडी भरून वाहत आहे. चिकनगाव व परिसरात सतत पावसाने सुकना नदीला चौथ्यांदा पूर आला आहे. त्यामुळे चिकनगाव व बाजार वाहेगाव येथील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. अजूनही पाण्याचा वेग वाढत चालला आहे.
संभाजीनगर जिल्हयात रात्री जोरदार पाऊस झाला तर चिकनगाव झोपडपट्टी परिसर व मंदिराला पाणी लागण्याची शक्यता आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक आता पाण्यात वाहू लागले आहे.


























































