कश्मीरमध्ये जगातील सर्वात मोठे इग्लू कॅफे; 37. 5 फूट उंच, पर्यटकांना पर्वणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमधील गुलमर्ग येथे इग्लू कॅफे तयार करण्यात आला आहे. त्याचे नाव स्नोग्लू आहे. स्नोग्लूची उंची 37.5 फूट आणि 44.5 फूट व्यास आहे. हा जगातील सर्वात मोठा इग्लू कॅफे असल्याचा दावा करण्यात आला असून विश्वविक्रमासाठी अर्ज करण्यात आला आहे.

कोल्हाई ग्रुप ऑफ हॉटेल्स अँड रिसोर्टने इग्लू कॅफे बनवला आहे. गेल्या वर्षी त्यांनी इग्लू केला होता. मात्र यावर्षीचा इग्लू खूप मोठा असल्याचे इग्लू कॅफेचे सदस्य माहूर यांनी सांगितले. सय्यद वसीम शाह यांनी त्याची निर्मिती केली आहे. 20 जणांच्या टीमने दोन महिन्यांत स्नोग्लू तयार केला आहे. त्यातील खुर्च्या आणि टेबल सगळंच बर्फाचे आहे. त्यावर मेंढीचे कातडे घातलेले आहे. आतमध्ये कश्मिरी हस्तकलेचे दर्शन घडवण्यात आले आहे.  बर्फाचे घर बघण्यासाठी पर्यटकांची पावले स्नोग्लूकडे वळत आहेत. याचा समावेश गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी इग्लू कॅफेचा विक्रम स्वित्झर्लंडच्या नावावर होता.