लातूरमध्ये दोन बार आणि एक दुकान फोडले

812

लातूर शहरातील नांदेडरोडवरील दोन बिअर बार आणि एक बिल्डींग मटेरियलचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. विवेकांनद चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील नांदेडरोडवरील राधिका बारमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या जरासंघ गुंडू भोसले यांनी विवेकांनद चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अज्ञात व्यक्तीने राधिका बिअरबारचे शटर उचकटून गल्यामधील रोख 22 हजार रुपये, पॉकेटमधील आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, दोन बँकेचे एटीएम कार्ड चोरुन नेले. तिथून जवळ असलेल्या मनोहर तुकाराम आलापुरे यांचे श्रीरंग एजन्सी हे बिल्डींग मटेरीयलच्या दुकानाचे शटर उचकटून काऊंटरच्या गल्यातील रोख 5 हजार 500 रुपये त्याचप्रमाणे यशोदीप बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटचे शटर उचकटून 10 हजार रुपये चोरुन नेण्यात आले. या चोरीप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या