खिडकीचे प्लायवूड काढून चोराचा दागिन्यांवर डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मरोळ पोलीस वसाहतीत राहणाऱया पोलीस अधिकाऱ्याच्या घरातच चोराने डल्ला मारला. रात्रीच्या अंधारात खिडकीला लावलेले प्लायवूड काढून चोरटा घरात घुसला आणि लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने व रोकड असा साडेपाच लाखांचा ऐवज चोरून नेला.

मरोळ पोलीस वसाहतीमधील इमारत क्रमांक-15मधील पहिल्या मजल्यावर चंद्राकांत बागल हे पोलीस अधिकारी राहतात. एक जुलैच्या रात्री बागल व त्यांच्या पत्नी जेवण करून झोपी गेल्या. पण रात्री साडेबाराच्या सुमाराम पावसाचे पाणी गळू लागल्यामुळे दोघेही उठले तेव्हा खिडकीचे प्लायवूड नसल्याचे बागल यांच्या नजरेस पडले. त्यामुळे बागल दाम्पत्याने कपाटातील दागिने, पैशांची पाहणी केली असता पाच लाखाचे दागिने व 51 हजारांची रोकड नसल्याचे आढळले. या विरोधात पवई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मरोळ पोलीस वसाहतीमधील इमारतींच्या डागडुजीचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी इमारतींना बांबूंच्या परांची बांधल्या आहेत. त्याचा फायदा घेत चोरी झाल्याची शक्यता असल्याने वसाहतीमधील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.