
आपल्या चेहऱ्याच्या काळजीसाठी आपण नवनवीन उपाय करुन बघत असतो. कच्चे दूध फार पूर्वीपासून त्वचेच्या काळजीसाठी वापरले जात आहे. त्यामध्ये असलेले पोषक घटक त्वचेचे पोषण करण्यास आणि ती निरोगी ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच आजीपासून ते घरातील जाणत्या स्त्रिया चेहऱ्यावर कच्चे दूध लावण्याचा सल्ला देत असत. खरंतर, कच्च्या दुधाने त्वचेला अनेक फायदे होतात.
कच्च्या दूधात लॅक्टिक अॅसिड असते त्यामुळे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते. तसेच दूधात असलेले व्हिटॅमिन ए त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि रंग उजळवते.
चेहऱ्यावर कच्चे दूध कसे लावायचे?
एका भांड्यात कच्चे दूध घाला आणि त्यात कापूस बुडवा. हा कापूस चेहऱ्यावर हलक्या हाताने लावावा. दुधाने चेहरा स्वच्छ केल्यानंतर, पाण्याने धुवा. अशाप्रकारे, सकाळी आणि संध्याकाळी दुधाने चेहरा स्वच्छ करता येतो.
Beauty Tips – चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी हा फेसपॅक आहे सर्वात उत्तम आणि स्वस्त, वाचा
दूध आणि तांदळाचे पीठ
दूध आणि तांदूळ एकत्र करून स्क्रब तयार करा. हे स्क्रब चेहऱ्यावर हलके लावता येते आणि नंतर चेहरा धुवून स्वच्छ करता येतो. दूध आणि तांदूळ चेहऱ्यावर फेस मास्क म्हणून देखील लावता येतात.
दूध आणि हळद
एका भांड्यात 2 चमचे दूध आणि चिमूटभर हळद मिसळून मिश्रण तयार करा. ते चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ तसेच ठेवा आणि नंतर चेहरा धुवून स्वच्छ करा. त्वचा उजळ होते.
चेहरा तरुण दिसण्यासाठी घरातील ‘हा’ पदार्थ आहे खूपच महत्त्वाचा, वाचा
दूध आणि केळी
केळी दुधात मिसळून फेस पॅक तयार करता येतो. हा फेस पॅक चेहऱ्यावर 20 मिनिटे लावता येतो. अर्धे केळे मॅश करा, ते एका वाटी दुधात मिसळा आणि फेस पॅक बनवा. हा फेस पॅक बनवण्यासाठी, अर्ध्या केळीमध्ये आवश्यकतेनुसार दूध मिसळून पेस्ट बनवता येते.
दूध आणि मध
दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले मध दुधात मिसळून चेहऱ्यावर लावता येते. दूध आणि मधाचे मिश्रण चेहऱ्यावर लावण्यासाठी, कापसाचा गोळा त्या मिश्रणात बुडवा आणि चेहऱ्यावर लावा.
दुधाचा टोनर
चेहऱ्यासाठी हे टोनर (मिल्क टोनर) बनवणे सोपे आहे. टोनर बनवण्यासाठी, गुलाबपाणी कच्च्या दुधात मिसळून हे टोनर वापरता येते. 2 चमच्यांमध्ये एक चमचा गुलाबजल मिसळून टोनर तयार केला जातो. एकाच वेळी खूप टोनर बनवून साठवून ठेवू नका. हे तयार केलेले टोनर कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा.