ब्राझीलच्या संरक्षणमंत्र्यांसह तिन्ही सैन्यदल प्रमुखांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्राझीलमध्ये कोरोना महामारीमुळे होत असलेल्या मनुष्यहानीसोबतच मोठे राजकीय संकटही उभे ठाकले आहे. संरक्षणमंत्र्यांसह लष्कर, नौदल व हवाई दलप्रमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोरोनाची स्थिती हाताळण्यात यश न आल्यामुळे राष्ट्राध्यक्ष जेर बोलसोनारो यांच्या विरोधात असंतोष धुमसत आहे. तो आता आणखी वाढला आहे. जगभरात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू ब्राझीलमध्ये होत आहेत. त्यामुळे बोलसनारो यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याची जनतेची भावना आहे. त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी निदर्शने केली जात आहेत. तीनही सैन्यदलांचे प्रमुख राष्ट्राध्यक्षांच्या पदावर राहण्याच्या भूमिकेशी असहमत होते. त्यामुळे त्यांनी देशातील सद्यस्थितीची नैतिक जबाबदारी घेत राजीनामे दिले. परराष्ट्रमंत्र्यांनीदेखील सोमवारी पदाचा राजीनामा दिला होता.