
अहिल्यानगर शहरात बिबटय़ाचे थेट आगमन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील आठरे पाटील पब्लिक स्कूल शेजारील कराळे वस्तीजवळील उसाच्या शेतात बिबटय़ाची तीन पिल्ले आढळून आल्याने खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच, पोलीस आणि वन विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
बिबटय़ाची पिल्ले पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी मादी बिबटय़ा असण्याची शक्यता व्यक्त करत नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले. दरम्यान, या भागात मोठा पिंजरा लावण्यात आला असून, मादी बिबटय़ाचा शोध घेण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जात आहे.























































