गणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले, सलग दुसऱ्या दिवशी घटना

50
sunk_drawn_death_dead_pic

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

बेळगाव अथणी येथून गणपतीपुळ्यात फिरण्यासाठी आलेले तीन पर्यटक रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता बुडाले या बुडणार्‍या पर्यटकांना जीवरक्षक, छायाचित्रकारांनी आणि अन्य व्यवसायिक यांनी जीवाची बाजी लावून वाचवले. गणपतीपुळ्यातील ही सलग दुसरी घटना आहे. सोमवारीही किनाऱ्यावरील व्यवसायिक मदतीला धावले. त्यामुळे जीवरक्षकांची गरज प्रकर्षाने जाणवली.

बेळगाव येथून तिघेजण गणपतीपुळ्यात फिरण्यासाठी आले होते. ते तिघेजण समुद्रात पोहायला गेले असता बुडाले. आपण बुडत असल्याची जाणीव होताच तिघांनी वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरु केला. किनारपट्टीवर एकच जीवरक्षक होता. त्याच्या जोडीला किनारपट्‌टीवरचे छायाचित्रकार आणि अन्य व्यावसायिक आले आणि त्यांनी क्षणाचा विलंब न लावता समुद्रात उड्या मारल्या समुद्रात बुडालेल्या गणेश रावसाहेब संकपाळे (वय 24), मल्लीका अर्जुन सुरेश पाटील (वय 23), बसमोडा अर्जुन नाईक वय 20 यांना वाचवले. जीवरक्षक रोहित चव्हाणसह निखील सुर्वे, विरेंद्र सुर्वे,प्रसाद पेडणेकर, सिद्धेश सुर्वे, अमेय केदार, पद्माकर गावडे, संतोष गोताड, सौरभ माने यांनी या बचावकार्यात सहभाग घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या