
सामना ऑनलाईन । जम्मू
जम्मू कश्मीर पोलिसांनी रविवारी जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. परिमपोरा भागातून या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले. या दहशतवाद्यांकडून स्फोटके बनविण्याचे साहित्य व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी या दहशतवाद्यांना अटक केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या नाड्या आवळल्या आहेत.
Jammu & Kashmir Police: Three terrorists affiliated with the proscribed terror outfit Jaish-e-Mohammed (JeM) were arrested today based on a credible input. Incriminating material including ammunition & live rounds recovered. A case has been registered. pic.twitter.com/wbJvCgD4zg
— ANI (@ANI) March 24, 2019






















































