
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना परीक्षेचे पेपर बेकायदेशीर मार्गाने पुन्हा लिहिण्याची संधी प्राध्यापकाने दिल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या युनिट सहाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी प्राध्यापक, विद्यार्थ्यांसह चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मॅथेमॅटिक्स-दोन या विषयाचे लिहिलेले उत्तरपत्रिकेचे 6 बंडल, 2 लाख 6 हजारांची रोकड, उत्तरपत्रिका ठेवलेली कंट्रोल रूमची चावी असे साहित्य जप्त केले आहे.
प्रा. प्रतिक किसन सातव (37), आदित्य यशवंत खिलारे (20), अमोल अशोक नागरगोजे ( 19), अनिकेत शिवाजी रोडे (20) हे विद्यार्थी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.