ट्रॉलीला दुचाकी धडकून तीन तरुणांचा जागीच मृत्यू, ट्रॅक्टरचालकावर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिफ्लेक्टर नसलेल्या ऊस वाहतूक करणाऱया ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकल्याने दुचाकीकरील तीन तरुण जागीच ठार झाले. दौंड – पाटस अष्टकिनायक मार्गाकर गिरीम गावाच्या हद्दीतील हॉटेल स्वानंदसमोर 13 नोक्हेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पोलिसांना कुठलीही खबर न देता निघून गेला असून, त्याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुण श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील रहिवासी होते. या घटनेमुळे काष्टी गावावर शोककळा पसरली आहे.

ऋषिकेश महादेव मोरे (वय 26), स्वप्नील सतीश मनुचार्य (वय 24) व गणेश बापू शिंदे (वय 25, तिघे रा. काष्टी बाजारतळ परिसर, काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. नगर) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी ऋषिकेश मोरे याचे वडील महादेव गुलाब मोरे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅक्टरचालक विशाल निवृत्ती दिवेकर (रा. वरवंड, ता. दौंड) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋषिकेश मोरे व त्याचे मित्र स्वप्नील मनुचार्य आणि गणेश शिंदे हे तिघे एकाच दुचाकीवरून 13 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास दौंड-पाटस रस्त्याने दौंडच्या दिशेने जात
होते. गिरीम गावाच्या हद्दीतील हॉटेल स्वानंदसमोर त्यांची दुचाकी आली असता समोरून येणाऱया वाहनाचे प्रखर लाईट दुचाकीस्वाराच्या डोळ्यांवर पडले. त्यामुळे तो गोंधळला आणि त्याने दुचाकी डाव्या बाजूला घेतली. मात्र, यावेळी समोर असलेल्या ऊस वाहतूक करणाऱया ट्रक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरात दुचाकी धडकली. ट्रक्टरने अचानक केग कमी केल्याने तसेच ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकीस्वाराला ट्रॅक्टर-ट्रॉलीचा अंदाज न आल्याने ही धडक झाली.

यामध्ये ऋषिकेश व गणेश जागेवरच ठार झाले, तर स्वप्नील हा गंभीर जखमी झाला. स्थानिक ग्रामस्थ व दौंड पोलिसांनी तिघांनाही उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, अपघातानंतर ट्रक्टरचालक विशाल दिवेकर हा ट्रक्टर-ट्रॉलीसह तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तहसीलदारांच्या साखर कारखान्यांना सूचना

– या दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर सर्वच स्तरांतून विनारिफ्लेक्टर ऊस वाहतूक करणाऱया वाहनांवर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी झाली. त्यानंतर श्रीगोंदा तहसीलदारांनी तालुक्यातील चारही साखर कारखान्यांच्या चेअरमनशी पत्रव्यवहार करत ऊस वाहतूक करणाऱया बैलगाडी, ट्रक्टर, ट्रक अशा सर्व वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यासह मोटार वाहन कायद्याअंतर्गत सर्व बाबींची पूर्तता करण्याबाबत सूचना केल्या आहेत. या सूचनांचे कारखान्यांनी पालन न केल्यास उद्भवणाऱया परिस्थितीला कारखाने जबाबदार असतील, असा इशारा तहसीलदारांनी कारखान्यांना दिला आहे.

तिघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार

– दौंड येथील ग्रामीण रुग्णालयात तिन्ही तरुणांचे शवविच्छेदन करण्यात आले. आज (दि. 14) सकाळी 8 वाजता तिघांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. तिघांवर काष्टी येथील घोडनदी तीरावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. तिघेही तरुण एकमेकांच्या शेजारी राहत होते. मुलांचे मृतदेह आणल्यानंतर कुटुंबातील सदस्यांचा एकच आक्रोश बघून सर्वांचे मन हेलावून गेले. यावेळी अनेकांचा अश्रूंचा बांध फुटला. अंत्यविधीनंतर संपूर्ण गावातील बाजारपेठ दिवसभर बंद ठेवण्यात आली.

धोकादायक ऊस वाहतूक घेतेय दरवर्षी शेकडो दुचाकीचालकांचे जीक

– या तीन तरुणांच्या अपघातामुळे पुन्हा एकदा विना रिफ्लेक्टर ट्रॉलीतून ऊस वाहतूक करणाऱया ट्रॅक्टरचालक, मालकांवर कारवाईचा मुद्दा समोर आला आहे. प्रत्येक वर्षी ऑक्टोबर ते मार्च असा सुमारे सहा महिने कारखान्यांचा गाळप हंगाम चालतो. सर्व रस्त्यांवर सहा महिन्यांपर्यंत ऊस वाहतूक सुरू असते. मात्र, कुठेही वाहतूक नियम पाळले जात नाहीत. परिणामी, दरवर्षी शेकडो दुचाकीचालकांचे जीव जात आहेत. यावर काहतूक पोलीस आणि आरटीओ कार्यालयही मूग गिळून गप्प आहे. आणखी किती लोकांचे जीक गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.