बोलबच्चन गँगचा भामटा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका महिलेला निर्जनस्थळी नेऊन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने बघायचे असल्याची बतावणी करून पळालेल्या बोलबच्चन गँगच्या एकाला पकडण्यात शिवडी पोलिसांना यश आले. तो भामटा दिल्लीचा असून पोलीस त्याच्या सहकाऱ्याचा शोध घेत आहेत.

सांताप्रुझ येथे राहणाऱया शशिकला गवळी या त्यांच्या आईला भेटण्यासाठी शिवडीला आल्या होत्या. त्या रेल्वे स्थानकाबाहेर आल्यानंतर दोघा तरुणांनी त्यांच्याकडे ठाण्याला जाण्याचा पत्ता विचारला. मग त्यांना बोलण्यात गुंतवून आरोपी त्यांना निर्जनस्थळी घेऊन गेले. आमच्याकडे एक लाख रुपये आहेत. ते तुमच्याकडे ठेवा असे आमिषही त्यांनी दाखवले आणि तुमची सोन्याची चेन व अंगठी दाखवा. मला पण अशी करायची आहे असे सांगून आपल्या ताब्यात घेतली मग तेथून पोबारा केला.

आपली फसवणूक झाल्याचे कळताच गवळी यांनी शिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कुऱहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण मांढरे, अंमलदार विजय आवकिकर, प्रभाकर देठे, शैलेश कदम, बळीराम मोरे आणि राहुल साळुंखे या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक बाबींचा अभ्यास करून व खबऱ्यांचे जाळे पसरवून गवळी यांना फसवणूक त्यांचे दागिने लंपास करणाऱया दोघांपैकी अशोक मोहनलाल (24) याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.