तिकीट रिझर्व्हेशनच्या नावाखाली लावायचा चुना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 एक्सप्रेसचे तिकीट रिझर्व्हेशन करून देतो, असे सांगून चुना लावणाऱ्याला अंधेरी पोलिसांनी अटक केली. काशीराम कहार असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी रोख रक्कम आणि कागदपत्रे जप्त केली आहेत. तक्रारदार सुनील पांडे हे अंधेरी परिसरात राहतात. आपली रेल्वेत ओळख असून तिकीट रिझर्व्हेशन करून देतो, अशा भूलथापा मारल्या. त्यावर विश्वास ठेवून पांडेने रिझर्व्हेशचा फॉर्म आणि तिकिटासाठी चार हजार रुपये दिले. रिझर्व्हेशन करून येतो असे सांगून काशीरामने तेथून पळ काढला. पांडे हे काशीरामची वाट पाहत बसले होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली. पांडेच्या तक्रारीवरून अंधेरी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकातील शेख, रक्षे, गाडे, साडीम आदींनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी जोगेश्वरी येथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत कारवाई केली.