चंद्रपूरात वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

514

चंद्रपूरमध्ये बोर्डा येथील एफडीसीएम कक्ष क्रमांक 95 मध्ये वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. मारोती नागोसे असे मृताचे नाव असून ते बोर्डा गावतील रहिवासी आहेत. ते बैलगाडीने कामाला जात असताना वाघाने झडप घालत त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. परिसरात वाघाचा वावर असल्याने दहशत पसरली आहे. वन विभागाने वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या