चमकदार चेहरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चमकदार चेहरा

  • साबुदाणा बारीक करून त्यामध्ये दही मिसळा. काही वेळानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. काही मिनिटांतच त्वचेची चमक वाढते.
  • साबुदाण्यामध्ये कॅल्शियम, मिनरल्स असते. यामुळे रंग गोरा होतो. चेहरा, केस चमकदार होतात. दह्यामुळे त्वचेचे पीएच लेव्हल संतुलित राहून त्वचा कोमल आणि तजेलदार होते. आठवड्यातून चार वेळा हा उपाय करावा.
  • साबुदाणा आणि दह्याचे मिश्रण लावल्याने केसातला कोंडा दूर होतो. केस चमकदार होतात. त्वचा आणि केस या दोन्हीसाठी फायदा होतो.
  • केळी आणि दुधासारख्या पौष्टिक पदार्थांचा आहारात नियमित समावेश असायला हवा. त्यामुळे त्वचा आणि केस दोन्हीसाठी  त्याचा फायदा होतो.
  • त्वचेवर वारंवार रासायनिक उत्पादनांचा वापर टाळावा. रात्री झोपण्यापूर्वी मेकअप रिमूव्हरने मेकअप काढून झोपायचे.
  • रोज सात तासांची झोप घेणे आरोग्यासाठी गरजेची आहे. जास्त ताणतणावही घेऊ नये. झेप पूर्ण न झाल्यामुळे त्वचेवर परिणाम होतो.