सोने तारण ठेवायचे असेल…

1 सोने तारण ठेवायचे असेल, तर कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडे जाऊन सोन्याचे दागिने किंवा नाणी तारण ठेवून कर्ज (गोल्ड लोन) घेऊ शकता.
2 तुमचे सोन्याचे वजन, शुद्धता आणि सध्याच्या बाजार मूल्यावर आधारित तुम्हाला कर्ज मिळते, जे सामान्यतः सोन्याच्या बाजार मूल्याच्या 75 टक्क्यांपर्यंत असते.
3 तुमच्या सोन्याचे मूल्यांकन केले जाईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला रोख रक्कम मिळेल. सोने तारण कर्जावरील व्याजदर इतर कर्जांच्या तुलनेत जास्त असू शकतो.
4 सोने तारण ठेवणे हे एक सुरक्षित कर्ज मानले जाते. कर्जाची परतफेड वेळेवर न झाल्यास सावकार सोने विपू शकतो. त्यामुळे कर्जाची परतफेड वेळच्या वेळी करा.
5 आवश्यक कागदपत्रे पूर्ण करा. दागिन्यांचे मूल्यांकन केवळ वजनावर नाही, तर कारागिरीवरही अवलंबून असते, ज्यामुळे जास्त कर्ज मिळू शकते.