
- आपण जसे जमिनीवर सुरक्षित असतो. तसेच पक्षी आकाशात विहार करतात. तो त्यांना निसर्गाने दिलेला हक्क आहे. एवढे लक्षात ठेवून पतंग उडवा.
- धारदार मांज्यात पक्षी गुंतू शकतात. त्यांना इजा होते. प्रसंगी प्राणास मुकतात.
- मांजाचा ओव्हरहेड वीजवाहक तारांना स्पर्श झाला किंवा तो तारांच्या वक्रकक्षेत जरी आला तरी तो अतिउच्च विद्युतदाबाचे वहन करू शकतो. ओव्हरहेड वायरजवळ पतंग उडवणे जीवासाठी धोकादायक ठरू शकते. शिवाय मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. पॉवर ग्रिडला हानी पोहोचून परिसर काळोखात राहू शकतो. यामुळे दुर्घटना घडू शकतात.
- पतंग उडवण्यासाठी रहदारीच्या ठिकाणाऐवजी मोकळे मैदान किंवा कमी रहदारीचे ठिकाण निवडा. यामुळे अपघाताची शक्यता कमी होईल.
- पतंग उडवताना उन्हापासूनही स्वतःचे संरक्षण करावे. जास्त वेळ उन्हात राहिल्याने अतिनील किरणांमुळे डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून सनग्लास जरूर वापरा.
- मांज्यामधील काचेमुळे जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून बोटांमध्ये रबरचे सेफ्टी बॅण्ड घाला. प्रथमोपचार पेटी जवळ ठेवा.
- इलेक्ट्रिक पोलजवळ तसेच विद्युत तारांजवळ पतंग उडवणे टाळा. यामध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी धडपड करू नका. यामुळे विजेचा धक्का लागून अपघात होऊ शकतात.
- पतंग उडविताना उच्च दाबाच्या (हाय टेन्शन) ओव्हरहेड वीज पारेषण तारांपासून दूर राहा. कारण मांजा हा विजेचा वाहक आहे. मांजाच्या आवरणामध्ये धातूची भुकटी वापरली असेल तर ते धोकादायक ठरू शकते.
- मांजा तयार करताना त्यामध्ये काचेची पावडर वापरली जाते. त्यामुळे पक्ष्यांना तसेच हाताच्या बोटाला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे सुती मांजा वापरा. यामुळे अपघाताची शक्यता कमी होते. चायनीज किंवा नायलॉनचा मांजा वापरणे टाळा.
- मोटरसायकल चालकांनी मकरसंक्रांतीच्या काळात हेल्मेट आणि गळ्याभोवती स्कार्फ घालून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण बर्याचदा भरधाव बाईक चालवताना मांज्यामुळे इजा, अपघात होण्याचा धोका असतो.
- लहान मुलं पतंग उडवताना घरातील वडीलधार्यांनी त्यांच्यासोबत राहणे गरजेचे आहे. पतंग उडवण्याच्या नादात अधिक उंचावर जाणे टाळा.
- हाताने तोडता येईल असा मांजा वापरा. पतंग कटल्यावर तुटलेला मांजा नष्ट करा.
























































