गरोदरपणात अशा प्रकारे घ्या काळजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

– गरोदर महिलांना ताप आला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधा. त्यासाठी घाबरून जाऊ नका.
– कोरोनाची बाधा झाल्यास घाबरून न जाता गरोदर महिलांसाठी आयसोलेशन वॉर्ड आहेत जिथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्वतःची काळजी घेऊ शकता.
– कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या.
– पावसाळ्याचे दिवस असल्याने साधा ताप आल्यास घाबरून जाऊ नका. तापाच्या लक्षणांवर लक्ष द्या. तसे काही वाटल्यास डॉक्टरांना लगेचच संपर्क करा.
– कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास शरीराचे तापमान सातत्याने तपासत राहा. डॉक्टरांशी बोला आणि स्वतःला आयसोलेट करून घ्या.
– पुदिना कोणत्याही ऋतूत सहज उपलब्ध होतो. जर आपल्याला पोटासंबंधी आजार असतील तर पुदिन्याच्या ताज्या पानामध्ये लिंबाचा रस व त्याच्या समान प्रमाणात मध मिळून सेवन केल्याने जवळ जवळ पोटाच्या सर्वच आजारांवर लवकर आराम मिळतो.