हे करून पहा – दिसते तसे नसते…

 

 चष्म्याची फ्रेम अचानक व्रॅक झाली तर काय कराल. सर्वात आधी फ्रेम प्लॅस्टिकची असेल तर व्रॅक झालेल्या ठिकाणी सुपर ग्लू किंवा पारदर्शक टेप लावू शकता. स्क्रू सैल झाला असेल तर स्क्रूड्रायव्हरने तो घट्ट करा. जर फ्रेम जास्त खराब झाली असेल, तर तुमच्या लेन्ससाठी नवीन फ्रेम घेऊ शकता.

 तुमची जुनी लेन्स नवीन फ्रेममध्ये बसवून घेऊ शकता. जर लेन्स व्रॅक झाली असेल, तर ती बदलणे आवश्यक आहे. कारण ती डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकते. या परिस्थितीत नवीन लेन्ससाठी तुम्हाला डोळ्यांच्या तपासणीची आवश्यकता असू शकते. त्यामुळे डॉक्टरकडे जाऊन तपासणी करा.