
अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने तृणमूल काँग्रेसचे आमदार माणिक भट्टाचार्य यांना अटक केली आहे. शाळा सेवा आयोग भरती घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. भट्टाचार्य हे बंगालमधील प्राथमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष होते आणि त्यांचा भरती घोटाळ्यात हात असल्याचा आरोप करण्यात येत होता. सोमवारी रात्री उशिरापर्यंत भट्टाचार्य यांची चौकशी करण्यात आली होती. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. पश्चिम बंगालमधील शाळांतील शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप असून या प्रकरणी अटक झालेले भट्टाचार्य हे दुसरे आमदार आहेत.
























































