Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस? वाचा 11 नोव्हेंबरसाठीचे भविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष ( ARIES – Thursday, November 11, 2021)

व्यवसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखणे गरजेचे आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चिक ठरणार आहे. नवीन वस्तूची खरेदी कराल. घरात प्रसन्न वातावरण असणार आहे. त्यामुळे दिवस मनाजोगा जाईल.
भाग्य रंग – पांढरा

वृषभ – (TAURUS – Thursday, November 11, 2021)

कुठलाही निर्णय घेताना घाई करु नका. आज आलेल्या संधीचं सोनं करुन घ्या. जुन्या मित्रमंडळींच्या अचानक भेटीगाठी होतील. दिवस सत्कारणी लागणारा आहे. बाहेरचे पदार्थ खाऊन पोट बिघडण्याची शक्यता आहे.

भाग्य रंग – निळा

मिथुन – ( GEMINI Thursday, November 11, 2021)

नोकरवर्गाचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, मेहनतीचे चीज होईल. मात्र तेवढ्याने हुरळून जाऊ नका. खेळाडूंना पुढे जाण्यासाठी वाव मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. बरं वाटत नसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

भाग्य रंग – लाल

कर्क – (CANCER Thursday, November 11, 2021)

चांगल्या गोष्टींना वेळ लागतो, त्यामुळे थोडा धीर धरा. आज एखादी गोड बातमी कानावर येईल. घरात आनंदी आनंद वातावरण असेल. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या. त्यांच्यासोबत वेळ घालवाल.

भाग्य रंग – पिवळा

सिंह – ( LEO Thursday, November 11, 2021)

मित्र-मैत्रींणींसोबत पैशांचे व्यवहार कराताना जपून करावेत. फसवणूक होण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये झालेले गैरसमज दूर होतील. भावंडांच्या तब्येतीची काळजी घ्या. थोरा-मोठ्यांचा आशिर्वाद लाभेल.

भाग्य रंग – गुलाबी

कन्या (VIRGO Thursday, November 11, 2021)

नवोदित साहित्यिकांसाठी आजचा दिवस मार्गदर्शनपर असणार आहे. दिग्गजांच्या भेटीगाठी होतील. विरोधक अडथळे निर्माण करतील त्यावर तुम्ही शिताफिने मात कराल. अंगदुखीची शक्यता आहे.

भाग्य रंग – करडा

तूळ ( LIBRA Thursday, November 11, 2021)

आज घरात साफसफाई कराल, मुलांसोबत वेळ घालवाल. बाहेर डिनरचा बेत आखाल. चांगुलपणाचा उशीरा का होईना नक्की फायदा होईल. तणावाकडे दुर्लक्ष कर नका.

भाग्य रंग – आबोली

वृश्चिक ( SCORPIO Thursday, November 11, 2021)

नवीन नोकरीची संधी येईल. मुलाखत द्यायला हरकत नाही. जसे आहात तसेच वागण्याचा प्रयत्न करा. जुने दुखणे डोकं वर काढेल. पाळीव प्राण्यांना अन्न खाऊ घाला. विद्यार्थी आज अभ्यासाचा कंटाळा कराल.

भाग्य रंग – आकाशी
धनू ( SAGITTARIUS Thursday, November 11, 2021)

तुमच्या स्पष्टपणाने आज जवळची व्यक्ती दुखावली जाईल. त्यामुळे बोलताना तोंडावर ताबा ठेऊन बोलावे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण असल्याने आजचा दिवस उत्साहात जाईल.

भाग्य रंग – हिरवा

मकर ( CAPRICORN Thursday, November 11, 2021)

प्रेमीयुगलासाठी आजचा दिवस मनाजोगा जाईल. बाहेर फिरायला जाणे होईल. कष्टाचे चीज होईल. जुनी येणी वसुल होतील. त्यामुळे मनप्रसन्न राहिल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला गती येईल. सुखद वार्ता कळेल. थंड पेय पिणे टाळावे, नाहीतर आजाराला आमंत्रण द्याल.

भाग्य रंग – नारंगी

कुंभ राशी भविष्य (AQUARIUS Thursday, November 11, 2021)

जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यवसायिकांना फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरदारवर्गाला आज आव्हानाला सामोरे जावे लागेल. कामाच्या ठिकाणी मजामस्ती कराल. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

भाग्य रंग -पांढरा

मीन (PISCES Thursday, November 11, 2021)

भूतकाळातील काही चुकांची जाणीव होईल. मुलांना आरोग्याच्या तक्रारी जाणवत असल्याने त्यांची कुरकुर होईल. पाहुणे मंडळी घरी येतील. नवरदेवाकडून सरप्राईज भेट मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील.

भाग्य रंग -जांभळा