Tokyo Olympic ‘सुवर्ण’स्वप्न भंगलं, रवीकुमार दहियाचा अंतिम लढतीत पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा आघाडीचा कुस्तीपटू रवीकुमार दहिया याचे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. गुरुवारी झालेल्या अंतिम लढतीत रवीकुमार दहिया याचा रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या जावुर युगुऐव या कुस्तीपटूने 7-4 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. या पराभवामुळे रवीकुमारला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

ऑलिम्पिक इतिहासामध्ये कुस्तीत हिंदुस्थानचे हे फक्त दुसरेच रौप्यपदक आहे. याआधी 2012 ला झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमार याने रौप्यपदक जिंकले होते.

रवी आखाड्यात तळपला

रवीकुमार दहियाने कझाकिस्तानचा कुस्तीपटू नुरीस्लाम सनयेक याला संघर्षपूर्ण लढतीत चितपट करून अंतिम फेरीत धडक दिली. रवीकुमारने सुरुवातीला 2-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर नुरीस्लामने भारंदाज डावावर गुणांची कमाई करीत आणि रवीच्या दुहेरी पटात घुसून लागोपाठ गुणांची कमाई करीत 9-2 अशी जबरदस्त आघाडी घेतली. पिछाडीवर पडलेल्या रवीकुमारनेही पटात घुसून महत्त्कपूर्ण गुणांची कमाई करीत अंतर 7-9 असे कमी केले. मात्र केवळ अर्ध्या मिनिटाची कुस्ती शिल्लक राहिल्याने हिंदुस्थानी कुस्तीशौकीन श्वास रोखून बसले होते. तितक्यात रवीकुमारने एकेरी पटातून नुरीस्लामवर ताबा मिळवत त्याचे दोन्ही खांदे जमिनीला टेकवत अस्मान दाखवले. अखेरच्या क्षणी रवीकुमारने थरारक विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. मात्र उपांत्यपूर्व लढतीत जखमी झालेल्या नुरीस्लामनेही दमदार कुस्तीचा नजराणा पेश करून कुस्तीशौकिनांची मने जिंकली.

Tokyo Olympic पदकाच्या आशांना सुरुंग, ‘वर्ल्ड नं. 1’ विनेश फोगट ऑलिम्पिकमधून बाहेर

तांत्रिक श्रेष्ठतेच्या जोरावर जिंकले पहिले दोन्ही सामने

रवीकुमारने सकाळी सुरुवातीच्या दोन्ही लढती टेक्निकल सुपिरियारिटी अर्थात तांत्रिक श्रेष्ठतेच्या जोरावर जिंकून रुबाबात उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. कोलंबियाच्या ऑस्कर एक्डुआर्डो टिग्रेरोस याचा त्याने 13-2 गुणांनी धुव्वा उडवून आपल्या अभियानास प्रारंभ केला. दुसऱ्या लढतीत रवीकुमारने बल्गेरियाच्या जियोर्जी केलेंटिनोक कांगेलोकची 14-4 गुणांनी दाणादाण उडवली.

The Wall – पी.आर.श्रीजेश, हिंदुस्थानी हॉकी संघाचा राहुल द्रविड