टोकियो पॅरालिम्पिकमध्ये हिंदुस्थानचं खातं उघडलं, भाविना पटेलला रौप्य पदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या खात्यात पहिलं पदक जमा झालं आहे. टेबल टेनिस या खेळात हे पदक मिळालं असून भाविना पटेल यांनी ते पटकावलं आहे.

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानसाठी पदक मिळवणारी ती पहिली हिंदुस्थानी महिला ठरली आहे. टेबल टेनिसच्या अंतिम फेरीत तिचा सामना चीनच्या की जोऊ उंग हिच्याशी झाला. मात्र, 7-11, 5-11, 6-11 अशा फरकाने भाविनाचा पराभव झाला. मात्र, या स्पर्धेची अंतिम फेरी गाठल्याने तिला रौप्य पदक मिळणार आहे.

तिच्या या विजयामुळे हिंदुस्थानच्या खात्यात पहिलं पदक मिळालं आहे. तिच्या या विजयानंतर तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तिच्या या विजयासाठी तिचं अभिनंदन केलं आहे.

अवघी एक वर्षाची असताना भाविनाबेन पटेलला पोलिओची लागण झाली आणि त्यात तिचे पाय निकामी झाले. पण, खूप मेहनतीने आणि जिद्दीने तिने हा विजय संपादन केला आहे. या खडतर प्रवासात साथ देणाऱ्या तिच्या प्रशिक्षकांचे तिने आभार मानले आहेत.