बोरिवली, एसव्ही रोडवरील वाहतूककोंडी कोरा केंद्र पूल फोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोरिवली, एसव्ही रोडसह परिसराची वाहतूककोंडी फोडणारा कोरा केंद्र ब्रीज पावसाळय़ापूर्वी वाहनचालक-प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पालिकेने 120 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या पुलाचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. या पुलासाठी करण्यात येत असलेल्या आकर्षक रोषणाईमुळे मुंबईच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असल्याची माहिती प्रमुख पूल अभियंता सतीश ठोसर यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ‘हिमालय’ ब्रीज 14 मार्च 2019 रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर पालिकेच्या माध्यमातून मुंबईतील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि नवे पूल बांधले जात आहेत. यामध्ये बोरिवली कोरा केंद्र येथील ब्रीजमुळे लिंक रोडवरून थेट पश्चिम द्रुतगती मार्गावर जाता येणार आहे. कल्पना चावला चौकासह शिवाय नेहमीच वाहनांची गर्दी असणारी दोन जंक्शनही टाळली जाणार असल्याने वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, अंधेरी येथील अंधेरी तेली गल्ली फ्लायओक्हर पूल मेअखेरपर्यंत काहतुकीसाठी खुला होणार असल्याने या ठिकाणची वाहतूककोंडीही फुटली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

असा आहे पूल

कोरा केंद्र नवीन ब्रीज 900 मीटर लांबीचा असून चार लेनचा आहे. या ब्रीजच्या कामासह पुलाला लागून असलेल्या पुलांचे काईडिंग केले आहे. त्यामुळे लिंक रोड ते बोरिकलीपर्यंतची काहतूक वेगाने होणार आहे.

हिमालय पूल मे 2023 पर्यंत सुरू

14 मार्च 2019 मध्ये दुर्घटना झालेला ‘हिमालय’ पूलही आता नव्याने बांधला जात आहे. विविध कारणांमुळे या पुलाचे काम रखडले होते. मात्र जानेकारी 2022 पासून हिमालय पुलाचे काम सुरू झाले असून मे 2023 पर्यंत प्रवाशांसाठी सुरू होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.