
विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांनी जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 10 दिवसांत हेल्मेट न घालणाऱया तब्बल 15 हजार 609 चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी दोन हजार 446 चालकांचे परवाने निलंबनासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडे पत्र पाठविण्यात आले आहे.
बेजबाबदार वाहन चालकांविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक कारवाया सुरू केल्या आहेत. गेल्या 10 दिवसांत विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱया 15 हजार 609 चालकांवर कारवाई करण्यात आली.
त्यापैकी तीन हजार 951 चालकांना वाहतूक चौकशीत समुपदेशनासाठी हजर राहण्यास समजपत्र अ देण्यात आले. तर एक हजार 947 चालकांचे समुपदेशन झाल्याने त्यांना समजपत्र ब देण्यात आले. यापुढेही विनाहेल्मेट चालकांविरोधातील कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.


























































