ट्रान्स हार्बर सेवा आज बंद राहणार

ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी, नेरूळ स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉकमुळे ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 वाजेपर्यंत वाशी, नेरूळ आणि पनवेलकडे जाणाऱया लोकल फेऱया तसेच पनवेल, नेरूळ, वाशी येथून ठाणेकडे येणाऱया लोकल फेऱया सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 वाजेपर्यंत बंद राहतील.

मध्य रेल्वेवर 5 तास ब्लॉक

मध्य रेल्वेवर देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी रेल्वे प्रशासनाने मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक जाहीर केला आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 या वेळेत सुटणाऱया डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा-मुलुंडदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.