
कोलंबियात पार पडलेल्या ‘मिस इंटरनॅशनल ट्रान्स 2021’ स्पर्धेत हिंदुस्थानच्या आर्ची सिंग या 22 वर्षीय ट्रान्सजेंडर युवतीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. एक ट्रान्सजेंडर ते मॉडेल आणि पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व, हा आर्चीचा प्रवास खूप खडतर आहे.
दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आर्चीला शाळेत असतानाच आपल्या वेगळेपणाची जाणीव झाली होती. आपण मुलगी असल्याची तिची ठाम धारणा होती. या प्रवासात तिला घरच्यांनी खंबीर साथ दिली. तिने जेव्हा लिंगबदल शस्त्रक्रिया करायचे ठरवले तेव्हा सगळं कुटुंब तिच्या पाठीशी उभे राहिले. वयाच्या 17 व्या वर्षी तिने आपली खरी ओळख जगासमोर आणली. त्यानंतर आर्चीने मॉडेलिंगमध्ये करीयर केले.
आम्हीही परिपूर्ण स्त्रिया…
ट्रान्सवुमनबद्दल असलेले गैरसमज दूर करायचे आहेत. आम्हालाही प्रतिष्ठा आहे. आम्ही परिपूर्ण स्त्रिया आहोत, एलजीबीटीक्यू समुदायाच्या न्याय्यहक्कासाठी मी झटणार आहे,अशी प्रतिक्रिया आर्चीने दिली.
























































