
अमेरिकेत जाऊन राहण्याचं स्वप्न अनेकांचे असते. अमेरिकेत राहणाऱया हिंदुस्थानी महिलेने तिथल्या मोठय़ा घरांचे वास्तव समोर आणले आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. जितकं मोठं घर, तितकी देखभाल जास्त. सफाईसाठी खूप मेहनत करावी लागते आणि हीच गोष्ट तिनं थोडय़ा विनोदी शैलीत सांगितली आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की, घरासमोर मोठे मैदान आहे, पण ते झाडांच्या पानांची भरून गेले आहे. घर सुंदर ठेवायचे असेल तर हे मैदान सतत स्वच्छ करावे लागते. उन्हाळ्यात गवत कापावे लागते आणि हिवाळ्यात बर्फ काढावा लागतो असा अनुभव ती महिला सांगते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ ‘me_and_my_bachchas’ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.




























































