कोपरगावमध्ये दोन ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । कोपरगाव

नागपूर- मुंबई महामार्गावर संवत्सर शिवारात दोन ट्रकमध्ये झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. मुंबईहून औरंगाबादकडे जाणारा ट्रक व समोरून औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक यांच्‍यात समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. अन्वर गौस खान (४१), आमेरखान लिकायत खान (२४) अशी अपघातात ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमधील ड्रायव्हर रजनी प्रेमात सोनी किरकोळ जखमी झाला आहे. त्याला कोपरगाव साईव्दारका (नाईकवाडे) हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ट्रकचा समोरचा भागाच चक्काचूर झाला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. ग्रामीण रूग्‍णालयाच्या माहितीनुसार पोलीसांनी आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या