
‘कोरोना’चा सामना करण्यासाठी पालिकेने युद्धपातळीवर काम सुरू केले असताना आता क्षयरोग आणि कुष्ठरोगाच्या उच्चाटनासाठी ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सोमवारपासून मुंबईतील दीड लाख घरांमध्ये जाऊन सुमारे पाच लाख 82 हजार लोकांची तपासणी करण्यात येणार आहे.
‘कोरोना’च्या भीतीने मुंबईकर धास्तावले असल्यामुळे क्षयरोग आणि कुष्ठरोगाला आळा घालण्यासाठी पालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये क्षयरोग, कुष्ठरोगाच्या उच्चाटनासाठी 16 ते 23 मार्चदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये पालिकेच्या 447 टीमच्या माध्यमातून घराघरात जाऊन तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेत सकाळी 9 ते दुपारी वाजेपर्यंत एकूण 145 परिसरातून 1 लाख 36 हजार 366 घरांतील 5 लाख 82 हजार 192 लोकांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली. या तपासणीत कोणत्याही व्यक्तीमध्ये क्षयरेगाची लक्षणे आढळून आल्यास पालिका किंवा खासगी क्ष-किरण केंद्रामध्ये मोफत चाचणी आणि थुंकी तपासणी केली जाईल. तसेच क्षयरोग संशयितांना मोफत औषधे देण्यात येतील. तर कुष्ठरोग संशयितांवर कैद्यकीय अधिकाऱयांमार्फत तपासणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कुष्ठरोगाची लक्षणे
कुष्ठरोगामध्ये त्वचेकर फिकट, लालसर बधिर चट्टे, त्या ठिकाणी घाम न येणे, जाड बधिर चकाकणारी त्वचा, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस किरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर किंवा तळपायावर मुंग्या येणे, बधिरपणा व जखमा असणे, हातापायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून व पाय गुडघ्यापासून लुळा पडणे, त्वचेकर थंड व गरम संवेदना न जाणवणे, हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, हातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे अशी लक्षणे आढळून येतात.
क्षयरोगाची लक्षणे
14 दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला, दोन आठवडय़ांपेक्षा अधिक काळ किंवा सायंकाळी वाढणारा ताप, वजन कमी होणे, थुंकीतून रक्त पडणे, छातीत दुखणे, भूक मंदावणे, मानेवर सूज येणे आदी लक्षणे क्षयरोगाची असल्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास तातडीने तपासणी करावी. नियमित औषधाचा कोर्स केल्यास क्षयरोग बरा होतो. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत, असे आवाहन डॉ. केसकर यांनी केले आहे.
























































