अरे वा! आता ट्वीट ही एडिट करता येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
twitter

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

एखादी पोस्ट लिहिताना काही चुकल्यास फेसबुकने एडिटचा पर्याय दिला आहे. त्याचप्रमाणे आता ट्विटरवर देखील आपल्या ट्वीट मध्ये काही बदल करायचे असल्यास शक्य आहे. तसा नवा पर्याय लवकरच येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

एखादे ट्वीट करताना काही चूक झाल्यास ते ट्वीट डिलीट केल्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र आता नवीन फिचर लवकरच ट्विटर लाँच करणार असून यामुळे ट्विटर वापरताना अडचण येणार नाही.

ट्विटर हे मोबाइलवरील एसएमएसच्या धरतीवर तयार करण्यात आलेले अॅप्लिकेशन असल्यामुळे त्यावर एडिटिंगचं फिचर उपलब्ध नव्हतं. पण गेल्या काही वर्षांपासून असं फिचर उपलब्ध करून द्या अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. ट्विटरचे सीईओ जॅक डोर्से यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्विटर एक 5-30 सेकंदांचा डिले फिचर आणणार आहे. यामुळे ट्वीट पोस्ट केल्यानंतर काही वेळात एडिट करता येईल आणि पुन्हा एकदा पोस्ट करता येईल.