
आज आपण स्मार्ट जगात आहोत. त्यात अनेक अॅप्लिकेशन्स आपलं काम सोपं करतात. हे अॅप्लिकेशन्स किंवा सॉफ्टवेअर्स कोडिंगच्या मदतीने बनवले जातात. जर यातला आंतरराष्ट्रीय सोर्स कोड लीक केला तर लोकांच्या डेटाशी छेडछाड होऊ शकते. असाच काहीसा प्रकार ट्विटरच्या बाबतीत घडला आहे.
ट्विटरचा इंटरनॅशनल सोर्स कोड गिफ्टहब नावाच्या एका सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्मवर अपलोड केला गेला होता. एक महिन्याहून अधिक काळ हा कोड या वेबसाईटवर उपलब्ध होता. ट्विटरला या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कंपनीने कॉपीराईट नोटीस जारी केली आहे. त्यानंतर या वेबसाईटवरून हे कोड हटवले गेले. आता हा कोड वापरून किती जणांनी डेटाशी छेडछाड केली आहे, याचा निश्चित आकडा कळू शकलेला नाही. पण, या कोडद्वारे डेटा लीकची शक्यता वाढली आहे.
हा कोड फ्रीस्पीचएन्थ्युझियास्ट नावाच्या युजरनेमने अपलोड केला गेला आहे. या कोडचा संबंध ट्वीटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्कशी आहे. पण, ट्विटरला आपल्या माजी कर्मचाऱ्यावर संशय आहे. त्यामुळे आता याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.



























































