नेवासात गोमांस विक्री करणाऱ्या दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नेवासा

नेवासा शहरात विनापरवाना बेकायदा गोमांस विक्री करतांना दोन जणांना पोलिसांनी रविवारी सकाळी पकडले. नेवाशात दाखल झालेल्या पोलिस निरीक्षक रणजित ढेरे यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. रविवारी सकाळी 6.30 वाजता पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा शहरातील खाटीक गल्लीमधील विनापरवाना बेकायदा गोमांस विक्री करतांना मार्कस मशिदीजवळ वाहीद बुढाण चौधरी (वय 34) याला पकडले. त्याच्याकडून 100 किलो सुमारे 12 हजाराचे मांस जप्त करण्यात आले. तर याच भागातील प्रभाग 13 मधील आयशा मशिदी जवळ मोईज आबु चौधरी (वय 20) याच्याकडून 50 किलो सुमारे 6 हजार रूपये किंमतीचे गोमांस जप्त केले. या दोघांविरूध्द नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.